चंदननगर पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मद्यधुंद अवस्थेत कारमधील साउंड सिस्टीम जोरात वाजवत धिंगाणा घालणे आणि पोलिसांवर दादागिरी करणे चौघांना चांगलेच महागात पडले आहे. चंदननगर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. १०) रात्री सव्वा नऊच्या सुमारास वडगाव शेरी येथील सोपान नगर परिसरात घडली.
पुणे: मद्यधुंद अवस्थेत कारमधील साउंड सिस्टीम जोरात वाजवत धिंगाणा घालणे आणि पोलिसांवर दादागिरी करणे चौघांना चांगलेच महागात पडले आहे. चंदननगर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. १०) रात्री सव्वा नऊच्या सुमारास वडगाव शेरी येथील सोपान नगर परिसरात घडली.
अटक करण्यात आलेले आरोपिंची नावे स्वप्नील संजय काळदाते (२५, रा. भिंगार, अहिल्यानगर), अक्षय अशोकराव इंगोले (२९, रा. परभणी), समीर गौतम डंबाळे (२२, रा. गणेशनगर, बोपखेल), अभिजीत राजेंद्र निकम (२०, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) अशी आहेत. या चौघांना पोलिस अंमलदार अजित कोकाटे यांच्या फिर्यादीवरून अटक करण्यात आली आहे.
१० फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास, वडगाव शेरी येथील सोपान नगर परिसरात चार युवक मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालत असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर बीट मार्शल अजित कोकाटे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले.
तिथे चारजण गाडीतून मोठ्या आवाजात गाणी लावत नाचत होते. पोलिसांनी त्यांना समजावले, मात्र त्याचा राग आल्याने त्यांनी पोलिसांची कॉलर पकडत दादागिरी केली.
या चौघांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करत पोलिसांशी गैरवर्तन केले. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे करत आहेत.
