महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : ज्येष्ठ पत्रकार तसेच शिवाजी खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक दिनेश रंगनाथ पोरे (वय ७५) यांचे गुरुवारी दि. १३ सायंकाळी सात वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर शुक्रवारी दि. १४ सकाळी ११ वाजता भूम येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दिनेश पोरे यांनी सुमारे २५ वर्षे दैनिक ‘सकाळ’मध्ये बातमीदार म्हणून कार्य केले होते.
