आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जामीनावर सुटलेल्या गुन्हेगाराकडून पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त

Spread the love

पुणे : मोक्क्यातील गुन्ह्यात जामीनावर सुटलेल्या एका गुन्हेगाराकडून पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त केले. पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखा युनिट ६ ने कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान ही कारवाई केली.

अनिकेत गुलाब यादव (वय २२, रा. सोपानगर, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. पुणे शहर पोलीस दलाकडून १३ फेब्रुवारी रोजी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यावेळी गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने लोणी काळभोर परिसरात गुन्हेगारांची तपासणी सुरू केली.

तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी अनिकेत यादव याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले.

या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आर्म्स अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या ऑपरेशनमध्ये पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, तसेच पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, समीर पिलाने, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, सुहास तांबेकर, प्रतीक्षा पानसरे आणि कीर्ती मांदळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.