प्रोऍक्विव्ह अबॅकस स्पर्धेत हाडोंग्रीच्या विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय यश
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : कोल्हापूर येथे पार पडलेल्या अत्यंत भव्य प्रोऍक्विव्ह अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन २०२५ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाडोंग्री येथील विद्यार्थिनी आरोही गजानन चव्हाण हिने लहान गटातील सायकल विनर अबॅकस प्रकारात राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आरोहीला सायकल, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेत आरोहीसह अनेक विद्यार्थ्यांनी आपली बुद्धीचातुर्याची कमाल दाखवली. तन्मय नागेश तळेकर, शुभ्रा काशिनाथ जावळे, श्रुती ज्ञानेश्वर शिरसागर, लक्ष्मण अतुल वाघमारे, संस्कार शंभोलिंग साखरे यांनी राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सिद्ध केले.
तसेच, स्वरा ऋषिकेश तळेकर, विराज विशाल कदम, गायत्री विपुल तळेकर, कृष्णा मिथुन चव्हाण, राजवीर दत्तात्रय जावळे, शिवन्या तानाजी पेंडपाले, चंद्रशेखर सुजित घोंगडे, कार्तिक शरद तळेकर, शांतीलिंग विद्यार्थी यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत विविध कॅटेगिरींमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले.
या सर्व विद्यार्थ्यांनी अमृता क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत घेतली आणि यश प्राप्त केले. स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
तसेच, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व शालेय समिती हाडोंग्री यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ व गुलदस्ता देऊन विशेष सन्मान करण्यात आला. या गौरव समारंभास जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सचिन गोवर्धन, शिवश्रेया प्रोऑक्टिव्ह अबॅकस क्लासच्या अमृता क्षीरसागर, मुक्ताप्पा तळेकर, माजी पंचायत समिती सदस्य व उपसरपंच रवींद्र लोमटे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काशिनाथ जावळे, भगवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील डोके, रविकिरण भोजने, राख मॅडम, सुधीर शिरसागर, अमृता वाघमारे, संध्या कदम, नैनी साखरे, गीता चव्हाण, आशा जावळे, जना बेलकर, अन्नपूर्णा तळेकर, वनिता तळेकर, विद्या तळेकर यांच्यासह पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
