भगवंत विद्यालयात स्वयंशासन दिन साजरा : संत सेवालाल महाराज जयंतीचे औचित्य
भूम : सामाजिक क्रांतीचे जनक संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मौजे हाडोंग्री येथील भगवंत विद्यालयात स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पंचायत समितीचे माजी सदस्य मुक्ताप्पा तळेकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि आपल्या बुद्धीच्या जोरावर यशाचे शिखर गाठावे.
येणारा काळ विज्ञानवादी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करावी.” असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. या कार्यक्रमासाठी स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक रिद्धी तळेकर, गटशिक्षणाधिकारी दिशा तळेकर, भगवंत विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अनिल तळेकर, श्रीमंत शिंदे, नवनाथ डांबरे, मुख्याध्यापक सुनील डोके, उपसरपंच रवींद्र लोमटे, त्रिमूर्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शांतलिंग घोंगडे, प्रकाश भाले, रमेश सुतार, श्रीमती पद्मिनी कवडे, श्रीमती कल्पना शिंगटे, भरत शिरसागर, रेवन बिडवे, महेश डंबरे, विकास तळेकर, रामा सुरवसे, कमलाकर पोतदार यांची विशेष उपस्थिती होती.
तसेच नैत्री लोमटे, सुहानी जगदाळे, भक्ती डमरे, निकिता डंबरे, प्रज्ञा शिरसागर, ऋतुजा महाडिक, यथार्थ नागटिळक, धीरज थोरात, नागेश साखरे, ज्ञानेश्वर दांईगडे, सुजल डमरे या विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.
यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन पद्मिनी कवडे यांनी मानले.
