आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गोरक्ष गायकवाड सोलापूर जिल्हाध्यक्षपदी

Spread the love

पुणे : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई डिजिटल मीडिया सोलापूर जिल्हाध्यक्षपदी पत्रकार गोरक्ष विलास गायकवाड यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्या मान्यतेने पुणे शहराध्यक्ष अनिल मोरे यांनी पंढरपूर येथे झालेल्या कार्यक्रमात ही निवड जाहीर केली.

स्वेरी कॉलेज, गोपाळपूर, ता. पंढरपूर येथे संपन्न झालेला “महा गौरव पुरस्कार 2025” हा भव्य आणि प्रेरणादायी सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. आपली चळवळ वृत्तपत्र समूह आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई डिजिटल मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या वेळी गौरविण्यात आले. याच कार्यक्रमात सोलापूर जिल्हाध्यक्षपदी गोरक्ष गायकवाड यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

गोरक्ष गायकवाड हे “आपली चळवळ” साप्ताहिकाचे संपादक असून, त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आहे. सोलापूर जिल्ह्यात डिजिटल मीडिया पत्रकारांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य जिल्हाध्यक्षांनी करावे, तसेच या भागातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकजूट निर्माण करावी, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी केले.