भरत भुरट यांच्या सामाजिक उपक्रमातून सहकार्य
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते भरत भुरट यांनी सिंहगड वाहतूक शाखेला स्वखर्चाने बारा बॅरिगेट्स प्रदान करून एक सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबविला आहे.
या उपक्रमाअंतर्गत आमदार भिमराव तापकीर यांच्या हस्ते सिंहगड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार बरडे यांच्याकडे बारा बॅरिगेट्स सुपूर्त करण्यात आले. श्री वर्धमान मानव सेवा फाउंडेशन यांच्या वतीने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वडगाव बुद्रुक येथे आयोजित या कार्यक्रमाला वर्धमान मानव सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष भरत भुरट, गंगा भाग्योदय सोसायटीचे अध्यक्ष काळूराम मते, ज्योती भुरट, मनोहर बोधे, देवेंद्र चव्हाण, सुहास शहा, नवीन दोशी मुथा, विक्रम छाजेड, हरीश भन्साळी, मुकेश धोका, नंदकुमार ओसवाल, जयंती गुलेचा, प्रवीण दोशी मुथा, रमेश पोरवाल, कमलेश दोषी मुथा, राहुल कांकरिया आदी मान्यवर उपस्थित होते.
