रक्तदान हेच श्रेष्ठदान : पुण्यात आयकर विभागाचा स्तुत्य उपक्रम
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. हेच मानवसेवा आणि हेच ईश्वरसेवा आहे,” या उद्देशाने प्रधान मुख्य आयकर आयुक्त, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधान आयकर आयुक्त-2, पुणे आणि डिवाइन जैन ग्रुप ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 फेब्रुवारी 2025 रोजी आयकर कार्यालय, पी.एम.टी. बिल्डिंग, स्वारगेट, पुणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपकांत प्रसाद (प्रधान आयकर आयुक्त-2, पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “माणसाने केलेले रक्तदान एखाद्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचवते, आणि रक्तदात्यासाठी याहून मोठी समाधानाची गोष्ट असू शकत नाही.”
या रक्तदान शिबिरात एकूण 81 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संग्राम गायकवाड (प्रधान आयकर आयुक्त-1, पुणे), अॅन कपथुआमा (प्रधान आयकर आयुक्त-3, पुणे) आणि नवीन गुप्ता (प्रधान आयकर आयुक्त – Exemption, पुणे) उपस्थित होते.
रक्तदान शिबिराचे समन्वयन नेहा देशपांडे (संयुक्त आयकर आयुक्त, रेंज-3, पुणे), श्रीकांत कुलकर्णी (सहायक आयकर आयुक्त, सर्कल-2, पुणे) आणि अरुण लेनका (आयकर अधिकारी, मुख्यालय-2, पुणे) यांनी केले.
तसेच डिवाइन जैन ग्रुप ट्रस्टचे अध्यक्ष संकेत शहा आणि तिमिर संघवी यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. डिवाइन जैन ग्रुप ट्रस्टचे चेतन जैन, हर्षल नौलखा, भूषण कर्नावट, प्रियंका शहा, हार्दिक शहा, उत्तम धोका तसेच आयकर आयुक्त कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वी ठरला.
