तरुणांचा ‘एफडी’ पेक्षा ‘इक्विटी’ वर भरोसा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शेअर बाजारात सध्या चढ -उतार सुरु आहे़ अस्थिरता वाढल्याचे दिसत आहे. असे असले तरी देशातील तरुणांमध्ये मात्र पैसे वाढविण्यासाठी पारंपारिक बँकेच्या एफडी पेक्षा शेअर बाजार लोकप्रिय असल्याचे दिसून आले आहे. भारतातील ३५ वर्षांखालील ४५ टक्के तरुणांनी शेअर बाजाराला प्राधान्य दिले आहे. रिसर्च फर्म १ लॅटिस आणि स्टॉकग्रो यांनी केलेल्या एका अहवालातूनही माहिती समोर आली आहे.
एका बाजूला ऑनलाईन गुंतवणुक करण्याचा सल्ला देणारी व बनावट नावाने प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देणाऱ्या सायबर चोरट्यांकडून मोठ्या प्रमाणावर लोकांची फसवणूक होत आहे. अनेक लोक कोणतीही माहिती नसताना केवळ मोबाईलवर आलेल्या लिंक, व्हॉटस अॅप ग्रुपमध्ये आलेले मेसेज यावरुन सायबर चोरट्यांच्या जाळ्यात सापडतात.
वाटते की आपण शेअर बाजारात गुंतवणूक करीत आहोत, प्रत्यक्षात त्यांची कोठेही गुंतवणुक होत नसते. ते आभासी अकाऊंटस असते. अशा प्रकारे शेअर बाजारात गुंतवणुक करण्याच्या आमिषाने हजारो लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक होत आहे.
गुंतवणुकीबाबत एआय आधारित शिफारशी, सल्ला मिळण्याची सोय, रिअल टाइम डेटा आणि व्हर्च्युअल ट्रेडिंग अनुभव या बाबींमुळे तरुणांसाठी गुंतवणुक करणे आणखी सोपे झाले आहे. डिजिटल गुंतवणूक प्लॅटफॉर्म आता लहान शहरांमध्येही पोहोचत आहे. त्यामुळे जास्त लोक वितीय साक्षरता मिळत आहेत.
