• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 18, 2025
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

बार्शीत FOSTAC अन्न सुरक्षा प्रशिक्षण शिबिर उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न

February 28, 2025
0
28 02 25 51
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

240 अन्न व्यावसायिकांचा सहभाग : अन्न सुरक्षा नियमांबाबत सखोल मार्गदर्शन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

बार्शी : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित FOSTAC (Food Safety Training and Certification) अन्न सुरक्षा प्रशिक्षण शिबिर दि. 28 फेब्रुवारी 2025 रोजी हॉटेल रामकृष्ण, पोस्ट चौक, बार्शी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराला तब्बल 240 अन्न व्यावसायिकांनी हजेरी लावून भरघोस प्रतिसाद दिला.

या शिबिराचे अध्यक्षस्थान अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, सोलापूरचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी भूषवले.तसेच अन्न सुरक्षा अधिकारी (FSO) श्रीमती अस्मिता टोणपे व रेणुका पाटिल यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

अध्यक्ष साहेबराव देसाई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “FOSTAC प्रशिक्षण अन्न व्यावसायिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्न सुरक्षा आणि दर्जा राखण्यासाठी व्यवसायिकांनी FSSAI च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे.

भविष्यात अन्न परवाना नूतनीकरण करताना आणि Hygiene Rating Certificate मिळवताना हे प्रमाणपत्र अनिवार्य असेल. त्यामुळे सर्व अन्न व्यावसायिकांनी हे प्रशिक्षण पूर्ण करावे.” तसेच, त्यांनी FOSTAC प्रशिक्षणाच्या विविध पातळ्यांविषयी माहिती दिली.

त्यांनी स्पष्ट केले की, Basic, Advanced आणि Special प्रकारातील प्रशिक्षण व्यवसायाच्या स्वरूपानुसार निवडता येते. हॉटेल, रेस्टॉरंट, किराणा दुकानदार, दुग्ध व्यवसायिक, बेकरी आणि मिठाई व्यावसायिक यांना या प्रशिक्षणाचा मोठा फायदा होईल.

अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता टोणपे यांनी FOSTAC प्रशिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करताना, अन्न सुरक्षा कायदे, खाद्य पदार्थ हाताळण्याच्या योग्य पद्धती, HACCP प्रणाली आणि व्यवसायातील सुरक्षा मानके याविषयी सविस्तर माहिती दिली.

त्या म्हणाल्या, “FOSTAC प्रशिक्षणामुळे अन्न व्यवसायिकांना त्यांच्या व्यवसायात सुरक्षितता आणि दर्जा राखण्यास मदत होईल. ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”

या शिबिरात FOSTAC ट्रेनर राहुल भालेकर यांनी स्वच्छता व आरोग्य, स्थान व परिसर, अन्न सुर्षेच्या इतर बाबी, साधन सामग्रीव भांडी, सुविधा, कर्मचाऱ्यांकरता सुविधा व प्रसाधनगृह, हवेची शुद्धता व वायुविजन, प्रकाश व्यवस्था, कच्चे अन्न पदार्थ प्राप्त करणे यावर प्रशिक्षण देण्यात आले आणि अन्न प्रदूषण टाळण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली.

या शिबिरात सहभागी झालेल्या सर्व 240 अन्न व्यावसायिकांना FSSAI तर्फे अधिकृत FOSTAC Training Certificate लवकरच प्रोप्रायटर च्या ईमेल वर ऑनलाईन पद्धतीने पाठवण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या व्यावसायिकांनी भविष्यात FDA विभागाने असे उपयुक्त उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी मागणी केली.

शिबिराच्या यशस्वी आयोजनामुळे बार्शी व परिसरातील हॉटेल, किराणा, बेकरी, दुग्धजन्य पदार्थ विक्रेते, मिठाई व्यावसायिक आणि इतर अन्न व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. उपस्थितांनी FOSTAC प्रशिक्षणामुळे अन्न व्यवसाय अधिक सुरक्षित आणि दर्जेदार करण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि FOSTAC प्रशिक्षणामुळे अन्न व्यवसायात शाश्वत सुधारणा घडतील, असा विश्वास व्यक्त केला.

Feb 2025 3 1

Latest Articles

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 18, 2025
जीतो पुणे JBN मीट में हुवा 26 करोड़ 16 लाख का बिजनेस

जीतो पुणे JBN मीट में हुवा 26 करोड़ 16 लाख का बिजनेस

June 18, 2025
जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

June 18, 2025
भाजप पदाधिकारी ओंकार कदमवर गुन्हा दाखल

भाजप पदाधिकारी ओंकार कदमवर गुन्हा दाखल

June 18, 2025
बार्शी–परंडा ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड : पोलिसांचे कौतुकास्पद यश

बार्शी–परंडा ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड : पोलिसांचे कौतुकास्पद यश

June 18, 2025
Load More
Previous Post

फरार कैदी ११ वर्षानंतर जेरबंद

Next Post

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

June 18, 2025
भाजप पदाधिकारी ओंकार कदमवर गुन्हा दाखल

भाजप पदाधिकारी ओंकार कदमवर गुन्हा दाखल

June 18, 2025
बार्शी–परंडा ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड : पोलिसांचे कौतुकास्पद यश

बार्शी–परंडा ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड : पोलिसांचे कौतुकास्पद यश

June 18, 2025
वेश्या व्यवसायाच्या आडून अंमली पदार्थांची तस्करी

वेश्या व्यवसायाच्या आडून अंमली पदार्थांची तस्करी

June 18, 2025
धुळे शहराच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात आढावा बैठक

राज्यात ‘मूल्यवर्धन ३.०’ च्या नव्या अध्यायास प्रारंभ!

June 18, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

June 12, 2024
तीन चाकी सायकल दुकानाचे ९१ दिव्यांग व्यक्तींना वाटप

तीन चाकी सायकल दुकानाचे ९१ दिव्यांग व्यक्तींना वाटप

June 14, 2024
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 18, 2025
जीतो पुणे JBN मीट में हुवा 26 करोड़ 16 लाख का बिजनेस

जीतो पुणे JBN मीट में हुवा 26 करोड़ 16 लाख का बिजनेस

June 18, 2025
जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

June 18, 2025
भाजप पदाधिकारी ओंकार कदमवर गुन्हा दाखल

भाजप पदाधिकारी ओंकार कदमवर गुन्हा दाखल

June 18, 2025
बार्शी–परंडा ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड : पोलिसांचे कौतुकास्पद यश

बार्शी–परंडा ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड : पोलिसांचे कौतुकास्पद यश

June 18, 2025

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 18, 2025
जीतो पुणे JBN मीट में हुवा 26 करोड़ 16 लाख का बिजनेस

जीतो पुणे JBN मीट में हुवा 26 करोड़ 16 लाख का बिजनेस

June 18, 2025

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र जैन वार्ता
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क

© 2024 Maharashtra Jain Warta