आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कारवाई

Spread the love

पुणे : धायरी परिसरात दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए अंतर्गत एक वर्षासाठी वर्धा कारागृहात स्थानबद्ध केले आहे.

ओंकार राजेंद्र भोसले (वय २६, रा. श्रीराम अपार्टमेंट, ऋतुनगरी सोसायटीजवळ, धायरी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. ओंकार भोसले हा सराईत गुन्हेगार असून तो २०२० पासून आपल्याजवळ कोयत्यासारखी घातक शस्त्रे बाळगतो. दुखापत करणे, मारामारी करणे, प्रसंगी जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि महिलांबाबत विनयभंग करणे असे गुन्हे त्याने केले आहेत.

त्यामुळे लोकांमध्ये त्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे. त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करूनही त्याच्या गुन्हेगारी कृत्यांवर काही परिणाम झाला नाही. त्याच्या अशा गुन्हेगारी कृत्यांमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली होती. त्याच्या भीतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नाहीत.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या सुचनेनुसार नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष कदम, पोलीस अंमलदार प्रथमेश गुरव आणि विजय विरणक यांनी एमपीडीए प्रस्ताव तयार करून तो पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठविला.

अमितेश कुमार यांनी त्याची पडताळणी करून ओंकार भोसले याला एक वर्षासाठी वर्धा कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे.