सदर बझार पोलिसांची जलद कारवाई : १००% मुद्देमाल हस्तगत
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सोलापूर : पत्रकार भवन चौक येथे टेम्पो अडवून मारहाण करत रोख रक्कम व कागदपत्रांची जबरी चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला अवघ्या आठ तासांत अटक करण्यात सदर बझार पोलिसांनी यश मिळवले आहे. पोलिसांच्या जलद कारवाईमुळे १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दि. ३ मार्च २०२५ रोजी पहाटे ५.१५ वाजता फिर्यादी टेम्पो (क्र. एम.एच.४२ बी ९०६५) ने जात असताना पाच अज्ञात इसमांनी वाहन अडवून चालक व फिर्यादीला मारहाण केली. आरोपींनी १०,०००/- रुपये रोख रक्कम, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड व ४० ग्रॅम वजनाचे चांदीचे ब्रेसलेट जबरदस्तीने काढून घेतले.
जलद तपास व आरोपींच्या मुसक्या आवळल्या गुन्ह्याची माहिती मिळताच सदर बझार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तत्काळ तपासाला सुरुवात केली. अंमलदार सागर सरतापे, राजेश चव्हाण आणि सोमनाथ सुरवसे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की, आरोपी मोदी स्मशानभूमी परिसरात थांबले आहेत.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी सदर बझार पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने जलद गतीने तपास करत अवघ्या आठ तासांत गुन्ह्याचा छडा लावला.
या कारवाईत प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, सहायक फौजदार औदुंबर आटोळे, पोलीस हवालदार सागर सरतापे, राजेश चव्हाण, संतोष पापडे, पोलीस शिपाई सागर गुंड, हणुमंत पुजारी, सोमनाथ सुरवसे, उमेश चव्हाण, राम भिंगारे, परशुराम म्हेत्रे यांचा मोलाचा वाटा आहे.
ही कामगिरी मा. पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप आयुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारी, तसेच सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे आणि गुन्हे विभागाचे निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
आरोपींना न्यायालयाने १८ मार्च २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर बझार पोलिसांच्या वेगवान आणि अचूक कारवाईमुळे या गुन्ह्याचा जलद उलगडा झाला असून, शहरातील कायदा-सुव्यवस्थेसाठी त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
अटक आरोपीचे नावे
१. मनोज सिताराम चलवादी (रा. श्यामा नगर, सोलापूर)
२. आकाश सदाशिव गड्डुम (रा. जय शंकर तालीमजवळ, सोलापूर)
३. महेश राम भंडारे (रा. मोदी जगजीवनराम झोपडपट्टी, सोलापूर)
४. विनायक सिद्राम म्हेत्रे (वय १९, रा. मोदी जगजीवनराम झोपडपट्टी, सोलापूर)
५. जुएल जोसेफ दिनकर (वय २४, रा. मोदी, सोलापूर)
