जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन
भूम : जागतिक महिला दिनानिमित्त भूम अलमप्रभू शहर विकास आघाडीच्या वतीने लकी ड्रॉ पद्धतीने महिलांना बक्षिसांचे वितरण होणार आहे. माजी नगराध्यक्षा संयोगीता गाढवे यांच्या अध्यक्षतेखाली व सिनेतारका माधवी निमकर यांच्या हस्ते बक्षिस वितरणाचा कार्यक्रम नगर परिषदेच्या प्रांगणात शनिवार दि ८ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन शहरातील सर्व प्रभागातील महिला मंडळांच्या वतीने करण्यात आले असून या कार्यक्रमात दैवशाला साबळे, कोमल गाढवे, अर्चना साळुंके, प्रतिक्षा शेटे, संगिता भोसले, अंजली वरवडे, भारती माळी, वैष्णवी अंधारे, अमृता भोगिल, शिल्पा गायकवाड, या महिलांच्या वतीने सुकुटी, वॉशिंग मशीन, एल इ डी टी व्ही, फ्रिज, सोफा, कपाट, कुलर, ओहन, डायनिंग टेबल, शोकेस, मिक्सर, गॅस शेगडी, टीपॉय, कुकर, व इत्यादी संसार उपयोगी वस्तूंची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
यावेळी शहरातील प्रत्येक कलाकार महिलांसाठी १०८ पैठणी संयोगीता संजय गाढवे महिला मंडळाच्या वतिने ठेवण्यात आले आहे. सदरील कार्यक्रम वेळेत सुरू होणार आहे. या कार्यक्रमास शहरातील सर्व महिलांनी वेळेत व जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोगीता संजय गाढवे, डॉ सई संयोगिता संजय गाढवे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच गाढवे परिवारातर्फे ९ मार्च ते १० मार्च संध्याकाळी ६ वाजता महिलांसाठी तर ९ वाजता पुरुषांसाठी छावा चित्रपट मोफत दाखविण्यात येणार आहे. यासाठी शहरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे संयोगिताताई गाढवे यांनी आवाहन केले आहे.
