दी पूना मर्चंटस चेंबरची मागणी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : देशातील अनेक राज्यांमध्ये नसलेला व्यवसाय कर (प्रोफेशनल टॅक्स) रद्द करण्यात यावा, अशी मागणी दी पूना मर्चंटस चेंबरकडून करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात कर्मचाऱ्यांकडून दरमहा ७५०० रुपयांवर पगार असलेल्यांकडून १७५ रुपये तर अधिक पगार असलेल्यांकडून २०० रुपये व्यवसाय कर कपात करुन भरावा लागतो. देशातील इतर राज्यांमध्ये व्यवसाय कर लागू नाही.
आपल्यामुळे आपल्या राज्यातील हा कर रद्द करण्यात यावा, अशी मागणी केल्यानंतर महिला कर्मचाऱ्यांसाठी व्यवसाय करासाठी पगाराची मर्यादा २५ हजार रुपये इतकी करण्यात आली आहे़. तसेच भागीदारी फर्मला तसेच त्यातील प्रत्येक भागीदाराला व्यवसाय कराचा भरणा करावा लागतो.
जी एस टी कर प्रणाली लागू करताना एक देश एक कर याची अंमलबजावणी करण्याचे ठरले होते. हा कर रद्द करुन व्यावसायिक तसेच नोकरदारांना दिलासा मिळावा, असे निवेदन शासनाला पाठविले असल्याचे चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी सांगितले.
