वाहतूक सुरक्षा जनजागृतीसाठी पोलिस विभाग व संचेती ट्रस्टचा सामाजिक उपक्रम
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : महिला दिनाचे औचित्य साधून मार्केट यार्ड वाहतूक पोलीस विभाग व स्वर्गीय इंदुमती बन्सीलाल संचेती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष हेल्मेट वाटप उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमात अनेक महिलांनी सहभाग नोंदवला आणि सुरक्षित वाहतूक नियमांचे पालन करण्याचा संकल्प केला. अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपयुक्त (वाहतूक शाखा) अमोल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक विभाग) अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
तसेच मार्केट यार्ड वाहतूक विभागाचे प्रमुख सचिन खेतमाळस यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. वा या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. उपस्थित महिलांनी या उपक्रमाचे स्वागत केले व भविष्यातही असे जनजागृती अभियान राबवावेत, अशी इच्छा व्यक्त केली.
ढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर हेल्मेटचा वापर ही काळाची गरज आहे. विशेषतः दुचाकीस्वार महिलांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट घालावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. स्वर्गीय इंदुमती बन्सीलाल संचेती चॅरिटेबल ट्रस्ट ने या उपक्रमात सहकार्य करत महिलांसाठी मोफत हेल्मेट वाटपाची जबाबदारी स्वीकारली.
“महिलांची सुरक्षा ही केवळ कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी महत्त्वाची आहे. वाहन चालवताना हेल्मेटचा वापर हा प्रत्येकाने करायलाच हवा. महिलांना सक्षम व सुरक्षित करण्यासाठी आमच्या ट्रस्टतर्फे असे सामाजिक उपक्रम पुढेही सुरू राहतील.” – अभय संचेती
