आयोजनासाठी गुंतवणूक करायला लावून घातला ५० लाखांना गंडा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
याबाबत रोहन शिंदे (रा. रावेत) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चिराग दोशी (रा. नारायण पेठ), चैतन्य वैद्य (रा. आनंद विहार कॉलनी, सिंहगड रोड), पुष्कर जगताप, अक्षय स्वामी (रा. निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शिवाजीनगरमधील एका हॉटेलमधये ऑगस्ट ते ३१ ऑक्टोंबर २०२४ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सिव्हिल इंजिनिअर असून इंटिरिअर डेकोरेशनचे काम करतात. त्यांची चिराग दोशी याच्याशी मैत्री झाली. त्याने आमची अॅपबीट कंपनी असून चैतन्य वैद्य, सुजल देशमुख, अर्जुन मेहता असे आम्ही पार्टनर असून आम्ही दांडिया, होळी, कॉलेजचे फ्रेशर पार्टीचे आयोजन करतो. त्यातून आम्हाला चांगले पैसे मिळतात.
त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांना रास रंगीलो नावाचा मोठा इव्हेंट करु असे सांगितले. त्यासाठी फिर्यादी यांनी ३५ लाख रुपये गुंतवणुक केली. त्यावर त्यांना २० लाख रुपये नफा देण्याचे ठरविण्यात आले. रास रंगीलो हा कार्यक्रम ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री पार पडला.
त्यानंतर ते हिशोब करु लागले. तेव्हा त्यांनी ६ हजार ८०० पासेस विक्री केल्याचे दाखविले. प्रत्यक्षात कार्यक्रमाला ९ ते १० हजार लोक उपस्थित होते. चिराग दोशी, चैतन्य वैद्य, अक्षय स्वामी व पुष्कर जगताप यांनी फेक पासेस तयार करुन विकलेल्या तिकीटांपेक्षा २ ते ३ हजार लोक अधिक कार्यक्रमाला उपस्थित होते. या फेक पासेसमधून त्यांनी २० लाख रुपयांची त्यांची फसवणूक केली.
फिर्यादी यांची मुळ गुंतवणुक ३० लाख ६६ हजार रुपये व नफा २० लाख रुपये अशी ५० लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केली. त्यांनी मुळ गुंतवणूक केलेली रक्कम परत मागितली असता पुष्कर जगताप याने शिवीगाळ करुन तुला पैसे देत नाही़. तुझे हात पाय कसे मोडायचे याची माहिती आहे, अशी धमकी दिली़. हा तपास पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील अधिक करीत आहेत.
