महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
आळंदी : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी महिला सन्मान व मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांच्या पत्नी मंजुश्री वडगावकर, प्रसिद्ध निवेदिका स्वप्ना भुजबळ मॅडम, विद्यालयाच्या पर्यवेक्षिका अनिता पडळकर, अनुजायिनी राजहंस, ज्येष्ठ लिपिका संगीता पाटील आणि शिक्षिका हेमांगी उपरे यांच्या हस्ते माऊली पूजनाने करण्यात आली.
यानंतर विद्यालयातील सर्व महिला शिक्षिकांचे विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. गुलाब पुष्प, गजरा आणि कॅडबरी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यालयात आनंदी आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते.
विद्यालयाच्या सांस्कृतिक हॉलमध्ये महिला शिक्षिकांसाठी “खेळ रंगला मनोरंजनाचा” या अनुषंगाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील प्रसिद्ध निवेदक कैलास दुधाळे आणि प्रसिद्ध निवेदिका स्वप्ना भुजबळ उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमामध्ये महिला सन्मानाचा अनोखा उत्सव साजरा करण्यात आला.
