पिंपळे निलखमध्ये अत्याधुनिक PET SCAN सेंटर सुरू
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : SDM डायग्नोस्टिक सेंटर, पिंपळे निलख येथे PET SCAN सेंटरचे भव्य उद्घाटन संपन्न झाले. या सोहळ्यास फोर्स मोटर्सचे अध्यक्ष अभय फिरोदिया आणि सुप्रसिद्ध डॉक्टर डॉ. सत्यशील नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, जेपी गुरुदेव महाराज यांच्या पवित्र आशीर्वादाने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
उद्घाटनप्रसंगी अभय फिरोदिया यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी SDM डायग्नोस्टिक सेंटरच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. डॉ. सत्यशील नाईक यांनी PET SCAN चे महत्त्व समजावून सांगितले. जेपी गुरुदेव महाराजांनी आपल्या आशीर्वचनातून उपस्थितांना आशीर्वाद दिले आणि सर्व रुग्णांच्या उत्तम आरोग्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
PET SCAN ही कर्करोगाच्या अचूक निदानासाठी अत्याधुनिक सुविधा आहे. या तपासणीद्वारे डॉक्टरांना योग्य उपचार पद्धती निश्चित करण्यास मदत होते. शरीराच्या विशिष्ट भागाची बायोप्सी झाल्यानंतर, कर्करोग निदान झाल्यास पुढील उपचारांसाठी PET SCAN अनिवार्य ठरतो. त्वरित निदान आणि योग्य उपचारासाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे.
खाजगी क्षेत्रात PCMC (पिंपरी-चिंचवड) मध्ये हे पहिले आणि पुणे महानगरपालिका हद्दीत हे दुसरे PET SCAN सेंटर आहे. येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानासह आणि माफक दरात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी SDM डायग्नोस्टिक सेंटरचे सर्व डायरेक्टर दीपकभाई शाह, डॉ. महेश बोरा, डॉ. शैलेश शर्मा, डॉ. केविन बोरा आणि तेजस शर्मा यांनी विशेष सहकार्य केले. त्यांनी उद्घाटन सोहळ्याला उपस्थित सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये राजेश शाह, दीपक बोरा, डॉ. शैलेश गुजर आणि राजकुमार चोरडिया यांचा समावेश होता. शेवटी, डॉ. महेश बोरा यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि सेंटरच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
