आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भर रस्त्यात लघुशंका करणाऱ्याची काढली धिंड

Spread the love

पुणे : दारूच्या नशेत भर रस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल यांची सोमवारी पोलिसांनी शास्त्रीनगर चौकात धिंड काढली.

शनिवारी सकाळी गौरव आहुजा बीएमडब्ल्यू कारमधून उतरून भर चौकात लघुशंका करत होता. एका नागरिकाने त्याचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर टाकला. हा व्हिडिओ अल्पावधीतच सर्वत्र व्हायरल झाला. त्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली होती.

येरवडा पोलिसांनी आज या दोघांना घटनास्थळी नेऊन नेमका कुठे हा प्रकार घडला, याची पाहणी केली. त्यावेळी दोघांच्या चेहऱ्यावर बुरखा घालण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके आणि अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांनी नेमके काय आणि कसे केले याची पाहणी केली.