आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दोन हजार बांधकामे पाडली

Spread the love

पुणे : शहराभोवती असलेल्या राष्ट्रीय व राज्य मार्गांवरील अनधिकृत बांधकामांवर पीएमआरडीए (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) ने कारवाईचा बडगा उगारला असून, गेल्या ९ दिवसांत जवळपास दोन हजार बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.

पुणे शहर परिसरात महामार्गालगत अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, महामार्गावरील वाहतुकीस अडथळे निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे ३ मार्च ते ११ मार्च या कालावधीत पीएमआरडीएने सलग ९ दिवस अतिक्रमणविरोधी मोहिम राबवली.

या मोहिमेत १,९९२ बांधकामांवर कारवाई करत १,९९,२०० चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली. पुणे-नाशिक रोड, पुणे-सोलापूर रोड आणि चांदणी चौक ते पौड रस्ता या भागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.