आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बिबवेवाडीत दारूच्या अड्ड्यावर कारवाई

Spread the love

पुणे : बिबवेवाडी परिसरातील नाज पान शॉपच्या पाठीमागील भागात अवैध दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 80 लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त करून नष्ट करण्यात आली आहे. जप्त केलेल्या दारूची किंमत सुमारे 8 हजार रुपये असल्याची माहिती मिळाली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी नगमा राजपाल राजनटे (वय 27) या महिलेला महिला पोलिसांच्या उपस्थितीत ताब्यात घेतले आहे. तिच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. ही कारवाई बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस हवालदार संजय गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल

आशिष गायकवाड, वंदना सूरवसे आणि त्यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अवैध व्यवसायांवर पोलिसांनी सातत्याने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.