आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

इन्स्टाग्रामवर न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी

Spread the love

पुणे : महिलेला ब्लॅकमेल करण्यासाठी तिच्या नावाने बनावट इंस्टाग्राम आयडी तयार करून, फोटो डिलीट करण्याच्या मोबदल्यात पैसे मागण्यात आले. पैसे न दिल्यास फोटो मॉर्फिंग करून न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

रघुवर बलराम चौधरी (वय १९, रा. शिंदे वस्ती, हडपसर, मुळ रा. बिहार) असे गुन्हेगाराचे नाव आहे. रघुवर चौधरी याने पिडित महिलेचा फोटो व नाव वापरुन इन्ट्राग्राम वर आय डी तयार केला.

त्याने फोटो व इन्स्टाग्राम आय डी डिलिट करण्यासाठी २ हजार रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले नाही तर फोटो मॉफिंग करुन न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या महिलेने त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले.

पैस न दिल्याने त्याने या महिलेच्या भावाचे इन्स्टाग्राम वर मॉफींग केलेले या महिलेचे न्यूड फोटो पाठविले व आणखी फोटो पाठवायचे नसेल तर इन्स्टाग्रामवर मॅसेज करुन पैशांची वारंवार मागणी केली.

ही फिर्याद मिळाल्यावर वानवडी सायबर पथकातील पोलीस हवालदार अमोल पिलाणे, अतुल गायकवाड यांनी त्याबाबत सोशल मीडियावरुन माहिती प्राप्त करुन रघुवर चौधरीचे नाव निष्पन्न केले. त्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडील मोबाईलची पाहणी केल्यावर त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोविंद जाधव, पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव, पोलीस अंमलदार पिलाणे, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख, सोमनाथ कांबळे व सुजाता फुलसुंदर यांनी केली आहे.