भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचा स्तुत्य उपक्रम : नागरिकांचा भरभरून प्रतिसाद
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या वतीने दि. १८ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ८ वाजता सर्वे नंबर 8 दाभाडी, आंबेगाव बुद्रुक येथे विशेष संवाद उपक्रम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमात वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर, गुन्हे पोलिस निरीक्षक राहुल खिलारे, सपोनि मिथुन परदेशी, सपोनि समीर कदम, सपोनि विश्वास भाबड आणि पोलीस कर्मचारी संतोष भापकर यांनी नागरिकांशी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या आयोजनात पतित पावन संघटनेचे खडकवासला विभाग अध्यक्ष विजय क्षीरसागर आणि स्थानिक महिला प्रतिनिधींचा मोलाचा सहभाग होता. यामध्ये स्वाती रायरीकर, फर्नांडिस ताई, धनश्री दुधाने, मंगल स्वामी, गौरी कुलकर्णी, संगीता चौधरी, विजय दारवटकर, वंदना हमकळस्कर, शकुंतला कुरपे, माधुरी दांगट यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमात गणेश व्हिला, जिजाऊ, साई श्रद्धा, आनंद व्हिला, ब्लू बेल, साई आनंद व्हिला या सोसायट्यांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी उपस्थित नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्या त्वरित सोडविण्याचे आश्वासन दिले.
त्यांनी सांगितले की, “कोणत्याही प्रकारची समस्या आल्यास पोलिस प्रशासन 24×7 नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज आहे.” या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास निर्माण झाला असून, पोलिस आणि नागरिकांमधील सहकार्याची भावना वृद्धिंगत झाली आहे.
