आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भारती मेडिकल कॉलेज येथे संशोधन परिषद

Spread the love

पुणे : भारती विद्यापीठ (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी) मेडिकल कॉलेज, पुणे येथे नुकतीच २० वी वार्षिक संशोधन परिषद यशस्वीपणे पार पडली. “वैद्यकीय शिक्षणात उत्कृष्टता, नवकल्पना आणि सर्वोत्तम पद्धतींचा विकास” या संकल्पनेवर आधारित ही परिषद आयोजित करण्यात आली होती.

सेठ जीएस मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल, मुंबई येथील डॉ. अविनाश सुपे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच यावेळी भारती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विवेक सावजी, मेडिकल कॉलेजचे प्रा. डॉ. मंदार करमरकर, डॉ. मेघना पडवळ, डॉ. संजय ललवाणी, डॉ. मृणाल केतकर, डॉ. ज्योती शेट्टी हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मानसिक आरोग्य, क्लिनिकल ऑडिट, वैद्यकीय शिक्षणात गेमिफिकेशन आणि वैद्यकीय महाविद्यालयांची बदलती भूमिका यावर चर्चासत्रे झाली.या परिषदेसाठी प्राध्यापक, पदव्युत्तर विद्यार्थी, इंटर्न आणि पदवीपूर्व विद्यार्थी असे सुमारे १००० डॉक्टर्स सहभागी झाले होते.