अवैधरित्या गौण खनिजांची वाहतूक करणार्या वाहनांचा शोध घेणारी प्रणाली
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (मशीन लार्निग) वापर करणाऱ्या उपक्रमाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे.
२०२३-२४ च्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात या उपक्रमाला पुरस्कृत करण्यात आले आहे. याबद्दल राज्यातील प्रथम क्रमांकाचा १० लाख रुपयांचा पुरस्कार अहिल्यानगरचे तत्कालीन व पुण्याचे सध्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांना जाहीर झाला आहे.
मापारी यांनी महसूल विभागात अनेक अभिनव तसेच माहिती व तंत्रज्ञान आधारित संगणकीय प्रणालीचा शासकीय कामकाजात उपयोग करण्यावर भर दिला आहे
जिल्हा प्रशासनाने गौण खनिज, ई हक्क, ई रेकॉर्ड, इक्युजे कोर्ट प्रणाली, ई ऑफिस, जलदूत, पाणी टंचाई व्यवस्थापन, पूनर्वसन, भूसंपादन विभागाचे डिजिटायझेशन, जिल्हास्तरीय प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी वॉररुम यासारख्या उपक्रमांमध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करुन सामान्यांना पारदर्शक, गतिमान व सुलभ पद्धतीने सेवा देण्यावर भर दिला आहे.
