आवृत्ती पुणे
← Back to Homepage

१३ लाखांचा मॅफेड्रॉन अंमली पदार्थ हस्तगत

Spread the love

पुणे : दुचाकीवरुन अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून त्याच्याकडून १३ लाख १७ हजार ५०० रुपयांचा ५८ ग्रॅम मॅफेड्रोन (एम डी) हस्तगत केला आहे. मोहम्मद नवाब मोहम्मद अख्तर शाह (वय ३३, रा. राजतारा, कॉम्प्लेक्स, लक्ष्मी कॉलनी, सोलापूर रोड) असे या तस्कराचे नाव आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व त्यांचे सहकारी हडपसर परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार सय्यद साहील शेख यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली. त्यावरुन पोलिसांनी दुचाकीवरुन जाणाऱ्या मोहम्मद शाह याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५८ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम डी) हा अंमली पदार्थ आढळून आला.

त्याच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात एन डी पी एस अ‍ॅॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार सय्यद साहिल शेख, संदिप शेळके, चेतन गायकवाड, संदिप जाधव, उदय राक्षे, रवींद्र रोकडे, मयुर सूर्यवंशी, निती जगदाळे, योगेश मांढरे, अझिम शेख, युवराज कांबळे, आझाद पाटील, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.