आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बनावट पावत्या बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Spread the love

पुणे : केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी) पुणे आयुक्तालयाच्या वसुली अधिकाऱ्यांनी इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) मिळवणे आणि ते चालवून घेण्यासाठी बनावट पावत्या तयार करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे.

या बनावट पावत्यांची अंदाजे रक्कम २५ कोटी रुपये इतकी आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) चा लाभ घेण्यासाठी आणि वापरण्यासाठी, वस्तूंची कोणतीही ने-आण न करता या बनावट पावत्या जारी केल्या गेल्या. अशा आठ बनावट कंपन्यांचा प्रारंभिक शोध लागला असून, त्यापैकी सहा पुण्यातील आहेत. फसवणूक केलेल्या कराच्या रकमेचे स्वरूप आणि फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या प्रादेशिक व्याप्तीचे मूल्यांकन केले जात आहे.

पुण्यातील रहिवासी असलेल्या या संघटित टोळीचा सूत्रधार असलेल्या तीन आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. ज्या कंपन्यांनी बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा (आयटीसी) लाभ घेतला आहे, त्यांच्याकडून पुढील तपास आणि वसुलीची कारवाई सुरू आहे.

सीजीएसटी पुणे आयुक्तालयाद्वारे, पुणे आणि जवळपासच्या भागात सक्रिय असलेल्या एकाधिक बनावट जीएसटी इनव्हॉइसिंग आणि बनावट आयटीसी पेडलिंग संघटित टोळीशी संबंधित नऊ जणांना गेल्या सोळा महिन्यांत अटक करण्यात आली आहे. बनावट आयटीसीच्या धोक्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी हा विभाग कटिबद्ध आहे.