आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अल्पबचत योजनांचे व्याजदर स्थिर

Spread the love

पुणे : केंद्र सरकारने नव्या आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या एप्रिल ते जून या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांचे व्याजदर स्थिर ठेवले आहेत. अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने ही घोषणा केली आहे.

आर्थिक वर्षातील १ एप्रिल ते ३० जून २०२५ या पहिल्या तिमाहीसाठी मागील तिमाहीचेच व्याजदर कायम राहणार आहेत. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) आणि पोस्ट ऑफिस बचत ठेव योजनांसाठी व्याजदर अनुक्रमे ७.१ टक्के आणि ४ टक्के इतका कायम राहिला आहे.

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत ठेवींवर ८.२ टक्के व्याजदर आहे. तीन वर्षांच्या ठेवींवरील दर ७.१ टक्के कायम ठेवला गेला आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर ८.२ टक्के आहे. ५ वर्षांच्या आवर्ती ठेवींचा दरही ६.७ टक्के कायम ठेवण्यात आला आहे.