महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्ते तसेच नॅशनल सायकल वर्ल्डचे संस्थापक, संचालक आणि उद्योजक अशोक प्रेमराजजी बाफना यांची 2025-2027 या कार्यकाळासाठी श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स, नवी दिल्ली यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर बिनविरोध निवड झाली आहे. अशोक बाफना गेली तीन वर्षे या संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. त्यांच्या समाजसेवेच्या कार्याची दखल घेत जैन संदेश (मासिक) फाउंडेशनतर्फे ‘समाजरत्न पुरस्कार’ तसेच श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सतर्फे ‘सेवारत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आले आहेत. जैन कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवित असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन!
