मार्केटयार्ड वाहतूक विभागाची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गंगाधाम चौक येथे राहणाऱ्या चंचला ओसवाल (रा. गंगाधाम) यांची पर्स गंगाधाम चौकातून रिक्षाने प्रवास करताना हरवली होती. सदर पर्समध्ये ₹11,000 रोख रक्कम आणि 1 मोबाईल होता.
मार्केटयार्ड वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी अमोल सोनटक्के आणि विजय पाटणे यांच्या प्रयत्नाने सदर पर्स सुखरूप शोधून चंचला ओसवाल यांच्याकडे परत करण्यात आली. मार्केटयार्ड वाहतूक विभागाच्या या कार्याबद्दल नागरिकांकडून कौतुक होत आहे.
