अध्यक्ष पदी डॉ. अंकिता लोढा यांची निवड
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : कोंढवा बुद्रुक परिसरातील होटेल सिरीमिरी बॅन्क्वेट हॉलमध्ये सोमवार, 31 मार्च 2025 रोजी जैन सोशल ग्रुप पुणे क्रिस्टलच्या 2025-27 या दोन वर्षांसाठी नवनिर्वाचित अध्यक्षा डॉ. अंकिता सागर लोढा यांचा व त्यांच्या कार्यकारिणीचा शपथविधी सोहळा मोठ्या थाटात पार पडला.
याप्रसंगी जैन सोशल ग्रुपचे मुख्य चेअरमन बिरेन शाह, दिलीप मेहता, दिलीप चोरबेले, सुजस शाह यांसारखे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बिरेन शाह यांनी डॉ. अंकिता लोढा व त्यांच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीला पदाची महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आणि शपथ दिली.
सोहळ्यात कोंढवा परिसरातील नितीन चोरडिया, दिलीप कटारिया, अभिजित डुंगरवाल, श्रीमल बेदमुथा, राहुल कर्नावट, मिथुन पालरेषा, विकी संघवी, डॉ. सागर लोढा आणि जैन संदेश मासिकाचे संपादक सुभाषबाबू लुंकड यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात स्नेहल बोरा यांनी नवकार महामंत्राने केली. त्यानंतर अक्षदा गांधी आणि मोनाली चतुरमुथा यांनी नृत्य सादर करून गणेश वंदना केली. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा सेजल कटारिया यांनी तीन वर्षांच्या कार्याचा आढावा घेत सर्वांना सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले. त्यानंतर, कमिटी सदस्यांनी एक गाण्यावर नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
बिरेन शाह यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीला पदभार दिला, ज्यात मोनाली चतुरमुथा, शितल बोरा (कमिटी सदस्य), अक्षिता गांधी (पीआरओ), वर्षा ओस्तवाल (खजिनदार), मयुरी बेदमुथा (सह खजिनदार), स्वाती कटारिया (सेक्रेटरी), अंकिता शिंगवी (सह सेक्रेटरी), बबिता खाटेर, सेजल कटारिया (संस्थापक अध्यक्षा) आणि डॉ. अंकिता लोढा (अध्यक्ष) यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा कांगटाणी यांनी केले, ज्यात त्यांनी मनोरंजनासाठी अनेक गंमतीशीर गेम्स खेळवले.
