आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बार्शी पंचायत समितीची आमसभा 12 एप्रिलला

Spread the love

पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : बार्शी तालुक्याच्या सर्वांगीण विकासावर सखोल चर्चा करण्यासाठी पंचायत समितीची वार्षिक आमसभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा शनिवार, 12 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता, यशवंतराव चव्हाण सभागृह, भाजी मंडई शेजारी, बार्शी येथे होणार आहे.

या आमसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार श्री. दिलीप गंगाधर सोपल (बार्शी मतदारसंघ) असणार आहेत, तर खासदार श्री. ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर (धाराशिव लोकसभा मतदारसंघ) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सभेसाठी शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, पंचायत समितीचे सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, तज्ज्ञ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील चालू आणि प्रस्तावित विकासकामांचा आढावा, योजनांची अंमलबजावणी, तसेच लोकहिताच्या विविध विषयांवर मंथन या सभेत होणार आहे.

सभेमध्ये मांडावयाच्या सूचना अथवा प्रश्न 9 एप्रिल 2025 पर्यंत पंचायत समिती कार्यालय, बार्शी येथे लेखी स्वरूपात सादर करावेत, असे आवाहन पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी श्री. महेश सुकळे यांनी केले आहे.