• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 18, 2025
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

लष्करातील भगोड्या जवानानेच केली घरफोडी

April 4, 2025
0
4 4 25 12 1
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

हवालदाराच्या घरातून चोरून नेले २१ तोळे सोन्याचे दागिने, वानवडी पोलिसांनी केली अटक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : लष्कराच्या हवालदाराच्या घरातून २१ तोळे सोन्याचे दागिने चोरून पळून गेलेल्या भगोड्या जवानाचा थेट बंगळुरुहून मागोवा घेऊन वानवडी पोलिसांनी साताऱ्यातून अटक केली. आरोपीकडून तसेच दिल्लीतील सोनारकडे विक्री केलेले १६ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

आरोपीचे नाव आहे अमरजीत विनोदकुमार शर्मा (वय ३०, रा. बघेल, ता. बदसर, जि. हमिरपूर, हिमाचल प्रदेश). अमरजीत शर्मा हा लष्करात जवान होता. सेवा कालावधी पूर्ण न करता तो लष्करातून पसार झाल्याने त्याला भगोडा घोषित करण्यात आले आहे. लष्करात काही काळ असल्याने त्याला सैनिकांचे राहणीमान आणि त्यांच्या राहण्याच्या पद्धतीची माहिती होती. त्याचा गैरफायदा घेऊन त्याने घरफोडी केली होती.

वानवडी परिसरात राहणारे लष्करातील जवान के. एम. वादीवेल्लू (वय ३५) यांची पत्नी कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यावेळी शर्मा यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील २१ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते.

घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील वानवडी, लष्कर, गोळीबार मैदान चौक, मंगळवार पेठ, खडकी, बंडगार्डन, विमाननगर, पुणे रेल्वे स्टेशन परिसर यासह सुमारे २० किमी परिसरातील १२० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. डाटा विश्लेषणानंतर संशयित चोरटा ओळखला गेला. तो पुणे स्टेशन येथील शेठ मोरारजी गोकुळदास सॅनेटोरियम आणि धर्मशाळा येथे राहत असल्याची माहिती मिळाली.

तेथील लॉजवर त्याने दिलेले आधार कार्ड आणि मोबाईल नंबर यावरून तो अमरजीत शर्मा असल्याचे उघड झाले. तांत्रिक तपासात तो उत्तर प्रदेश, अंबाला, जोधपूर, हिमाचल प्रदेश, दिल्ली अशा ठिकाणी वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली.पोलिस अंमलदार अमोल गायकवाड आणि विष्णु सुतार यांना माहिती मिळाली की, तो बंगळुरुत गेला आहे. त्याबरोबर पोलिस पथक बंगळुरुकडे रवाना झाले.


तो बंगळुरुहून बेळगावकडे बसने रवाना झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरु केला. बेळगाव येथे तपासणी करत असताना तो बसने साताऱ्याकडे जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी बेळगावहून त्याचा पाठलाग करून ३० मार्च रोजी पहाटे साताऱ्यातील बसमधून त्याला ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून २३,६०० रुपये, ४ मोबाईल, आमीर्चे कपडे, आधार कार्ड आणि स्टीलची कटावणी अशी सामग्री मिळाली. चौकशीत त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरी केलेले सोन्याचे दागिने हडपसर येथील सोनाराला विकल्याचे सांगितले.

पोलिसांनी करण सत्यप्रकाश डागर (वय २८, रा. बी टी कवडे रोड, घोरपडी) या सराफाला अटक करून त्याच्याकडून सोन्याचे दागिने जप्त केले. चोरी करून हिमाचल प्रदेशला जाताना त्याने दिल्ली येथे आर्मीचे कार्ड दाखवून एका सराफाकडे सोने गहाण ठेवून पैसे घेतले होते.

पोलिसांनी त्याला ही गोष्ट सांगितल्यावर त्याने गहाण ठेवलेले सोने हजर केले. त्याच्याकडून १३ लाख ७७ हजार रुपयांचे एकूण १६२ ग्रॅम दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलिस उपनिरीक्षक धनाजी टोणे यांच्याकडे तपासाची जबाबदारी आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोविंद जाधव, पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, अमोल गायकवाड, विष्णु सुतार, गोपाळ मदने, यतीन भोसले, सोमनाथ कांबळे, अभिजित चव्हाण, बालाजी वाघमारे यांच्या मेहनतीने शक्य झाली आहे.

पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक
लष्करी जवानाच्या घरातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणल्याने लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक केले. 

March 202515

Latest Articles

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 18, 2025
जीतो पुणे JBN मीट में हुवा 26 करोड़ 16 लाख का बिजनेस

जीतो पुणे JBN मीट में हुवा 26 करोड़ 16 लाख का बिजनेस

June 18, 2025
जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

June 18, 2025
भाजप पदाधिकारी ओंकार कदमवर गुन्हा दाखल

भाजप पदाधिकारी ओंकार कदमवर गुन्हा दाखल

June 18, 2025
बार्शी–परंडा ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड : पोलिसांचे कौतुकास्पद यश

बार्शी–परंडा ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड : पोलिसांचे कौतुकास्पद यश

June 18, 2025
Load More
Previous Post

जीतो पुणे ने नवकार महामंत्र दिवस के लिए उपजिल्हाधिकारी ज्योती कदम को सौंपा निवेदन

Next Post

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

June 18, 2025
भाजप पदाधिकारी ओंकार कदमवर गुन्हा दाखल

भाजप पदाधिकारी ओंकार कदमवर गुन्हा दाखल

June 18, 2025
बार्शी–परंडा ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड : पोलिसांचे कौतुकास्पद यश

बार्शी–परंडा ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड : पोलिसांचे कौतुकास्पद यश

June 18, 2025
वेश्या व्यवसायाच्या आडून अंमली पदार्थांची तस्करी

वेश्या व्यवसायाच्या आडून अंमली पदार्थांची तस्करी

June 18, 2025
धुळे शहराच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात आढावा बैठक

राज्यात ‘मूल्यवर्धन ३.०’ च्या नव्या अध्यायास प्रारंभ!

June 18, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

June 12, 2024
तीन चाकी सायकल दुकानाचे ९१ दिव्यांग व्यक्तींना वाटप

तीन चाकी सायकल दुकानाचे ९१ दिव्यांग व्यक्तींना वाटप

June 14, 2024
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 18, 2025
जीतो पुणे JBN मीट में हुवा 26 करोड़ 16 लाख का बिजनेस

जीतो पुणे JBN मीट में हुवा 26 करोड़ 16 लाख का बिजनेस

June 18, 2025
जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

June 18, 2025
भाजप पदाधिकारी ओंकार कदमवर गुन्हा दाखल

भाजप पदाधिकारी ओंकार कदमवर गुन्हा दाखल

June 18, 2025
बार्शी–परंडा ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड : पोलिसांचे कौतुकास्पद यश

बार्शी–परंडा ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड : पोलिसांचे कौतुकास्पद यश

June 18, 2025

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 18, 2025
जीतो पुणे JBN मीट में हुवा 26 करोड़ 16 लाख का बिजनेस

जीतो पुणे JBN मीट में हुवा 26 करोड़ 16 लाख का बिजनेस

June 18, 2025

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र जैन वार्ता
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क

© 2024 Maharashtra Jain Warta