नवले कॉलेजमधील प्रकार : कोविड-१९चा फायदा घेत लपवून देत होते परीक्षा
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कोविड-१९चा फायदा घेत पोलीस भरती परीक्षा देणाऱ्या दोन डमी परीक्षार्थींना अटक केली आहे. श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ब्लॉक-ए, वडगाव बुद्रुक येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला.
रामेश्वर अप्पासाहेब गवळी (वय २४, रा. घारेगाव, ता-पैठण, जि. औरंगाबाद) आणि श्यामराव विश्वनाथ भोंडणे (रा. मालेगाव, वाशीम) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी किशोर बोरोले (वय ५२, रा. सिंहगड रोड, पुणे) यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी संगनमत करून पोलीस शिपाई भरती सन २०१९ च्या लेखी परीक्षेमध्ये मूळ परीक्षार्थी श्यामराव भोंडणे यास चांगल्या मार्काने उत्तीर्ण करण्यासाठी कोविडचा फायदा घेऊन परीक्षा देण्याचा प्रयत्न करीत असताना आढळून आला. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक के. डी. संपकाळ करीत आहेत.















