सिंहगड पोलिसांत गुन्हा : नऱ्हे येथील पोलीस भरती परीक्षा केंद्रावरील प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पोलीस भरती २०१९ च्या परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करण्यासाठी पाच हजार रुपये घेऊन परीक्षा देणाऱ्या आणि मध्यस्थी करणाऱ्या तिघांना जेरबंद केले. ही घटना नऱ्हे येथील केंद्रावर घडली.
महेश सुधाकर दांडगे (रा. भराज बुद्रुक, ता. जाफराबाद, जि. जालना), विठ्ठल किसन जारवाल (रा. चिते-पिंपळगाव, जि. औरंगाबाद) आणि जनक सिसोदे (रा. नागोन्याची वाडी, ता. जि. औरंगाबाद) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विशाल शिंदे यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी संगनमत करून पोलीस शिपाई भरती २०१९च्या लेखी परीक्षेमध्ये मूळ परीक्षार्थी महेश दांडगे यास चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करण्यासाठी जनक सिसोदे यांच्या मार्फतीने विठ्ठल जारवाल याने लाख रुपयांच्या बदल्यात किसन जारवाल (नऱ्हे, पुणे) येथील परीक्षा केंद्रावर महेश दांडगे यांच्या नावाचे हॉल तिकीट घेऊन जात असताना पकडला.
पुढील तपास सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सी.सी. थोरबोले करीत आहेत.















