• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

सराफाने केली दुकानात चोरी

April 5, 2025
0
5 4 25 6
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

नजर चुकवून पत्नीच्या मदतीने केली होती चोरी : वारजे माळवाडी पोलिसांनी केली अटक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : वारजे माळवाडी येथील भाजीपाला, बांगड्या व मसाल्याचे पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानातून दागिने असलेली पर्स चोरीला गेली होती. ही चोरी पत्नीच्या मदतीने करणाऱ्या एका सराफाला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव संपूर्णानंद परमानंद वर्मा (वय ४३, रा. बालाजी बिल्डिंग, नेहरूनगर, पिंपरी) असे आहे. तो सोन्याचे दागिने घडविण्याचे काम करतो. काही काळ त्याने सराफी व्यवसायही केला होता, मात्र तो चालला नाही. त्यानंतर पत्नीच्या मदतीने त्याने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

याबाबत शमशाद लाला शेख (वय ४०, रा. सहयोगनगर, वारजे) यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यांचे अष्टविनायक चौक येथे भाजीपाला, बांगड्या व मसाल्याचे पदार्थ विक्रीचे दुकान आहे.

२२ मार्च रोजी त्यांचा मुलगा मसाले आणण्यासाठी मार्केटयार्डला गेला होता, त्यामुळे सायंकाळी त्या दुकानात एकट्याच होत्या त्यांनी पर्समध्ये सोन्याचे दागिने व २ लाख रुपये रोख रक्कम ठेवली होती.

दुकानात ग्राहकांची गर्दी झाली होती आणि शेजारील दुकानदारही मदतीला आले होते. याच दरम्यान, एक महिला बांगड्या पाहण्यासाठी काउंटरजवळ आली. तिने बांगड्या पाहिल्या आणि “सासूसाठी मोठ्या साइजच्या बांगड्या हव्यात” असे सांगितले.

शेख यांनी तिला, “सासूला घेऊन या” असे सांगितले. त्यावर तिने, “सासू कुठे आहे ते पाहते,” असे म्हणून घाईघाईने दुकानातून निघून गेली. शेख यांनी बांगड्यांचा गठ्ठा पुन्हा रॅकमध्ये ठेवण्यासाठी गेल्यावर लक्षात आले की, दागिने आणि रोख रक्कम असलेली पर्स गायब झाली आहे.

त्यामध्ये २ लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असे एकूण ४ लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. या गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे यांनी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार केले.

सुरुवातीला ज्या व्यक्तींवर संशय होता, त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली, मात्र त्यातून काही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर उत्तमनगर, वारजे, नळस्टॉप, निगडी, भोसरी, पिंपरी या परिसरांतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी व तांत्रिक विश्लेषण करण्यात आले.

पोलिस अंमलदार अमित शेलार यांच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक नरळे यांच्या पथकाने वारजेतील अतुलनगर परिसरातील विनायक हॉस्पिटलसमोर सापळा रचून संपूर्णानंद वर्मा याला अटक केली.

वर्मा स्वतः सराफ असून, त्याने आपल्या पत्नीच्या मदतीने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांकडून त्याच्या पत्नीचा शोध सुरु आहे. वर्मा याच्याकडून २ लाख रुपये रोख, २५० ग्रॅम चांदीचे दागिने आणि ६७ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो ऐवज फिर्यादींना परत करण्यात येणार आहे.ही कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश बडाख, पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार अर्जुन पवार, संजीव कळंबे, अमित शेलार, शरद पोळ, सागर कुंभार, बालाजी काटे, निखिल तांगडे, गोविंद कपाटे, अमित जाधव, योगेश वाघ, ज्ञानेश्वर चित्ते व गणेश शिंदे यांनी पार पाडली.

March 202517

Latest Articles

उसने दिलेल्या पैशांच्या वादातून महिलेचा गळा आवळून खून

उसने दिलेल्या पैशांच्या वादातून महिलेचा गळा आवळून खून

June 6, 2025
जीवनसाथीवरील ओळख महिलेला पडली महागात

महिला ज्योतिषीला सायबर चोरट्यांचा गंडा

June 6, 2025
शेगाव ते पंढरपूर रेल्वे मार्ग करण्यात यावा

शेगाव ते पंढरपूर रेल्वे मार्ग करण्यात यावा

June 6, 2025

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 6, 2025
कार पार्किंगच्या वादातून तरुणाच्या डोक्यात पंप मारून गंभीर जखमी

कार पार्किंगच्या वादातून तरुणाच्या डोक्यात पंप मारून गंभीर जखमी

June 6, 2025
Load More
Previous Post

घरफोडी करणारा परराज्यातील अट्टल गुन्हेगार जेरबंद

Next Post

जीतो के नैशनल जॉब्स फेयर को देशभर में मिला जबरदस्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

उसने दिलेल्या पैशांच्या वादातून महिलेचा गळा आवळून खून

उसने दिलेल्या पैशांच्या वादातून महिलेचा गळा आवळून खून

June 6, 2025
जीवनसाथीवरील ओळख महिलेला पडली महागात

महिला ज्योतिषीला सायबर चोरट्यांचा गंडा

June 6, 2025
शेगाव ते पंढरपूर रेल्वे मार्ग करण्यात यावा

शेगाव ते पंढरपूर रेल्वे मार्ग करण्यात यावा

June 6, 2025
कार पार्किंगच्या वादातून तरुणाच्या डोक्यात पंप मारून गंभीर जखमी

कार पार्किंगच्या वादातून तरुणाच्या डोक्यात पंप मारून गंभीर जखमी

June 6, 2025

समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

June 5, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

June 12, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
तीन चाकी सायकल दुकानाचे ९१ दिव्यांग व्यक्तींना वाटप

तीन चाकी सायकल दुकानाचे ९१ दिव्यांग व्यक्तींना वाटप

June 14, 2024
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
उसने दिलेल्या पैशांच्या वादातून महिलेचा गळा आवळून खून

उसने दिलेल्या पैशांच्या वादातून महिलेचा गळा आवळून खून

June 6, 2025
जीवनसाथीवरील ओळख महिलेला पडली महागात

महिला ज्योतिषीला सायबर चोरट्यांचा गंडा

June 6, 2025
शेगाव ते पंढरपूर रेल्वे मार्ग करण्यात यावा

शेगाव ते पंढरपूर रेल्वे मार्ग करण्यात यावा

June 6, 2025

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 6, 2025
कार पार्किंगच्या वादातून तरुणाच्या डोक्यात पंप मारून गंभीर जखमी

कार पार्किंगच्या वादातून तरुणाच्या डोक्यात पंप मारून गंभीर जखमी

June 6, 2025

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

उसने दिलेल्या पैशांच्या वादातून महिलेचा गळा आवळून खून

उसने दिलेल्या पैशांच्या वादातून महिलेचा गळा आवळून खून

June 6, 2025
जीवनसाथीवरील ओळख महिलेला पडली महागात

महिला ज्योतिषीला सायबर चोरट्यांचा गंडा

June 6, 2025

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र जैन वार्ता
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क

© 2024 Maharashtra Jain Warta