आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

राज्यस्तरीय श्री स्वामी समर्थ पुरस्कार वितरण सोहळा

Spread the love

पुणे : श्री स्वामी समर्थ ट्रस्ट आंबेगाव बुद्रुक च्या वतीने गेले चार वर्षे स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहाने दत्तनगर, टेल्को कॉलनी चव्हाणनगर आंबेगाव बुद्रुक येथे साजरा केला जातो. या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिर,भव्य किर्तन सोहळा, भजनसंध्या, पुरस्कार वितरण, महाप्रसादी, स्वामींच्या पादुका चे दर्शन आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यावर्षीच्या श्री स्वामी समर्थ राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी ठरले आदर्श धर्मगुरू राष्ट्रसंत योगीराज ह.भ.प श्री.भाऊमहाराज परांडे, आदर्श समाज प्रबोधन कीर्तनकार ह.भ.प प्रकाश महाराज साठे, आदर्श प्रशासकीय अधिकारी सुरेखा भणगे, आदर्श पोलीस अधिकारी प्रियंका गोरे, आदर्श पत्रकार रवी कोपनर, आदर्श उद्योजक विकास हजारे, आदर्श कलारत्न सुप्रिया शिंदे, आदर्श वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पडळकर, आदर्श शेतकरी सागरभाऊ पवार आदी मान्यवरांना सन्मानचिन्ह, शाल देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले.

झी टॉकीज फेम ह.भ.प विनोदाचार्य प्रकाश महाराज साठे यांचे सुश्रणीय कीर्तनाचा लाभ आंबेगाव, दत्तनगर परिसरातील नागरिक महिला भगिनी व स्वामी भक्तांनी घेतला. यावेळी प्रमुख पाहुणे गुरुवर्य बाळूभाऊ तापकीर, ट्रस्टचे अध्यक्ष काळूराम चव्हाण, सचिव रोहन चव्हाण, अनंता चव्हाण, सुषमा चव्हाण, अमिषा चव्हाण, पायल जाधव, उषा जाधव, शितल चव्हाण, ह.भ.प. श्री. लहू महाराज जाधव उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ट्रस्टच्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.