महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : दापोडी येथील जैन धर्म स्थानक भवनामध्ये भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जैन समाजाने भगवान महावीरांचे स्मरण केले.
भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त दापोडी जैन धर्म स्थानक भवन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी जलगाव येथील अलका संचेती यांच्या १६ व्या वर्षीय तप निमित्त भावाचा कार्यक्रम कर्नावट परिवाराच्या वतीने संपन्न झाला. कार्यक्रमात स्वर साधना बहु मंडळ, दापोडी यांनी भक्तीगीतांचे सुंदर सादरीकरण करून वातावरण भक्तिमय केले.
सदर कार्यक्रमास संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे, अविनाश काटे, अनिकेत काटे, आशा शेंडगे, संजय काटे, स्वाती ऊर्फ माई काटे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली.
तसेच आनंद छाजेड व निर्मला छाजेड यांचीही यावेळी उपस्थिती लाभली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिलीप भन्साळी, सतीश लुकड, आनंद बाफना, सुनील कोठारी, लिलाचंद लुनावत यांच्यासह दापोडी जैन श्रावक संघाचे सर्व पदाधिकारी, महिला मंडळ, युवक मंडळ आणि बहु मंडळ यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमानंतर सर्वांसाठी ‘गौतम प्रसादी’चे आयोजन करण्यात आले होते. ही प्रसादी स्व. राजीबाई कांतिलालजी कर्नावट व स्व. श्री कांतिलालजी मोहनलालजी कर्नावट यांच्या स्मरणार्थ मयूर राजेंद्र कर्नावट परिवाराने आयोजित केली होती.
