महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : आनंद दरबार येथे महावीर जयंतीनिमित्त एक भव्य व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी श्री पारसमलजी धोका यांच्या निवास स्थानावरून भव्य मिरवणूक निघाली आणि आनंद दरबार येथे त्याचे समापन झाले.
आनंद दरबार येथे कार्यक्रमात आनंद दरबार चे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी उपस्थितांचे स्वागत केले, उपाध्याय गुरुदेव गौतममुनिजी म. सा. यांनी उपस्थितांना ‘अहिंसा’ या जैन तत्त्वज्ञानाच्या मूलभूत मूल्यावर विचार मांडले. त्यांनी अहिंसेचे महत्त्व व आजच्या काळातील त्याची गरज यावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कीर्तन प्रभाकर ह.ब.प. गणेश महाराज भगत, गणेश ओसवाल, पी. आय. शारद जिने व मा. नगरसेवक युवराज बेलदरे यांनी आपली उपस्थिती नोंदवली. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाचे वातावरण भक्तिमय व प्रेरणादायी झाले.
या कार्यक्रमात विशेष सन्मान म्हणून “अहिंसा रत्न पुरस्कार” शिवाजीराव काळोखे व रामभाऊ बेलदरे यांना प्रदान करण्यात आला. त्यांनी शाकाहार व अहिंसेच्या मूल्यांवर आधारित जीवनशैली स्वीकारल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. या प्रेरणादायी कार्यक्रमाला सुमारे ३०० लोकांनी उपस्थित राहून आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष दुगड, प्रमोद राका यांनी विशेष प्रयत्न केले. सौरभ धोका यांनी सर्वांचे आभार मानले.
