महाराष्ट्र जैन वार्ता
भूम : महावीर जन्मकल्याणक दिनानिमित्त भूम शहरातील जैन समाजाच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून भगवान महावीरांच्या विचारांचा जागर केला.
भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक दिनानिमित्त भूम येथील कसबा जैन मंदिरातून भव्य मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. ही मिरवणूक बाजार रोड, गोलाई चौक, मेन रोड, नगरपालिका मार्गे मार्गक्रमण करत पुन्हा कसबा जैन मंदिर येथे संपन्न करण्यात आली.
या मिरवणुकीत पुरुष, महिला आणि लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. भगवान महावीरांच्या उपदेशांप्रमाणे मिरवणूक अत्यंत साधी, शांत व शिस्तबद्ध होती.
मिरवणुकीमध्ये अध्यक्ष सुनील डुंगरवाल, शितल शहा, अभय गांधी, विवेक पोकर्णा, स्वप्नील शहा, प्रदीप आहेरकर, डॉ. शांतीनाथ अंबुरे, बाहुबली एखंडे, राजकुमार आहेरकर, निलेश शहा, संतोष मुनोत, राजकुमार पितळे, नेमचंद मुनोत, नेमचंद पोकर्णा, विजय सुरपुरिया, महावीर भोपलकर सर, गणेश गुगळे, प्रीतम आहेरकर, डॉ. शुभम पोकर्णा, सूरज शहा, धवल गांधी, सुनील जोशी यांच्यासह अनेक जैन बांधव उपस्थित होते.
मिरवणुकीनंतर भगवान महावीरांची आरती करण्यात आली. या उपक्रमातून शांती, करुणा व अहिंसेचा संदेश देण्यात आला.
