५१ बाटल्यांचे रक्त संकलन : मान्यवरांची उपस्थिती आणि जैन समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त महर्षीनगर, मुकुंदनगर येथील प्रतिभा नवकार जैन संघ, जय आनंद प्रतिभा नवकार जैन युवक मंडळ, प्रभा प्रतिभा महिला मंडळ आणि अर्हम महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शोभायात्रा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शोभायात्रेची सुरुवात सकाळी शिळीमकर चौक, सतनामदेव स्कूल, महर्षीनगर येथून झाली. ही शोभायात्रा स्वामी समर्थ मंदिर, प्लॅटिनम टॉवर, पुजारी गार्डन मार्गे शाही बँकेट हॉल येथे पोहोचली. शोभायात्रेमध्ये भगवान महावीरांच्या रथासोबत भक्तिभावपूर्ण जय घोष, महिलांचा पारंपरिक गरबा, युवतींचे सांस्कृतिक सादरीकरण व वाजंत्रींचा गजर यामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले.
शोभायात्रेनंतर लगेचच शाही बँकेट हॉल येथे धार्मिक कार्यक्रम व रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण ५१ बाटल्यांचे रक्त संकलन करण्यात आले. हा उपक्रम दिलीप कर्णावट, चंद्रकांत दर्डा, दिलीप खाटेर, कांतीलाल पारख आणि सतीश धोका यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला.
या कार्यक्रमास माधुरीताई मिसाळ, अभय छाजेड, प्रविण चोरबेले, राजश्रीताई शिळीमकर, संदीप भंडारी, निलेश नवलखा, श्वेता होनराव, अनिल नहार, अभिजीत डुंगरवाल, हर्षद कटारिया, दिनेश खराडे, अरुण शिंगवी, श्रीनाथ भिमाले, बाळासाहेब ओसवाल, कविताताई वैरागे, अनिल भन्साळी, राजेंद्र शिळीमकर, पुष्कर आबनावे, बाळासाहेब अटल, राहुल गुंड, सुमित देसरडा आणि प्रतिभा धोका आदी मान्यवर उपस्थित होते.
गौतम प्रसादीचे लाभार्थी स्व. शांताबाई हिरालालजी चुत्तर यांच्या संथार पूर्णहुती निमित्त त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आले. सभामंडपाचे लाभार्थी अजित गुगळे, शिंगवी कुटुंब, लोढा कुटुंब व ललवाणी कुटुंब होते. प्रभावनेचे लाभार्थी स्व. भारती संचेती यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संचेती कुटुंब, विकी फूड प्रॉडक्ट्स, महर्षीनगर होते.
रक्तदान शिबिराचे लाभार्थी लायन्स क्लब ऑफ पुणे औंध पाषाण, लायन्स क्लब ऑफ पुणे बिबवेवाडी, गौतम लब्धी फाउंडेशन व जैन सोशल ग्रुप मार्केट यार्ड, पुणे यांनी आयोजन केले होते. रक्तदात्यांना भेटवस्तू राजेंद्र, विजय व गीता गुगळे (राईस कॉर्नर) कुटुंबाकडून देण्यात आल्या. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी गौतम प्रसादीचे आयोजन करण्यात आले.
