महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : आज भुम नगरपरिषदेचे मा. नगराध्यक्ष विकासरत्न श्री. संजय नाना गाढवे यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. प्रतापजी सरनाईक यांची त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी मंत्री महोदयांशी विविध विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा झाली. या भेटीप्रसंगी युवा सेना राज्य विस्तारक श्री. नितीन लांडगे, कळंब नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री. संजय मुंदडा, मुरुड येथील श्री. अभिजित मुंदडा, पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री. रामकिसन गव्हाणे, जांबचे सरपंच श्री. समाधान भोरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
