महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त मोहननगर येथील श्री तुळजाभवानी मंदिर प्रांगणात शालेय विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप करण्यात आले. विद्यादान प्रतिष्ठानतर्फे आयोजित या उपक्रमात वही वाटप सोनाली मेहेर, गणेश दातीर पाटील, प्रणाली मेहेर आणि शुक्रराज होरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात नवकार महामंत्राने करण्यात आली. याप्रसंगी सतीश मेहेर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, “भगवान महावीर यांचा संदेश जगा आणि जगू द्या, अहिंसा, क्षमा, परोपकार यांचा अंगीकार करा. भाषेतून आपण इतरांशी, तर मौनातून स्वतःशी संवाद साधत असतो.” कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालन सतीश मेहेर यांनी केले.
