महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : श्री जैन सामुदायिक उत्सव समितीच्या भव्य कार्यक्रमात महाराष्ट्र जैन वार्ताच्या महावीर जन्मकल्याणक विशेष अंकाचे भव्य प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी जितो अपेक्सचे अध्यक्ष विजय भंडारी, सकल जैन संघाचे अध्यक्ष विजयकांत कोठारी, देवीचंद जैन, उत्सव समितीचे अध्यक्ष आचल जैन, सचिव अनिल गेलडा, उद्योगपती सतीश चोपडा, राजेश शहा, तेरापंथ समाज अध्यक्ष महावीर कटारिया, महाराष्ट्र जैन वार्ताचे संपादक अभिजीत डुंगरवाल, संकेत डुंगरवाल, सतीश शहा, हिराचंद राठोड, हरीश शहा, संपत जैन, नितीन जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साही आणि भव्य स्वरूपात करण्यात आले होते. विशेषांकाच्या प्रकाशनामुळे उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्र जैन वार्ताच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातील अंकांसाठी शुभेच्छा दिल्या.
