अहिंसा, सामाजिक न्याय व संविधानिक मूल्यांचा संगम
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : बार्शी शहरात 13 एप्रिल 2025 रोजी एक ऐतिहासिक क्षण साकारला. खासदार ओमप्रकाश भूपालसिंह ऊर्फ पवन राजेनिंबाळकर यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेल्या तीन महत्वाच्या स्तंभांचे भव्य लोकार्पण विविध स्तरातील नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. या स्तंभांनी केवळ विकासाचे नव्हे, तर सामाजिक ऐक्याचे, समतेचे आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक म्हणून शहरात नवी दिशा निर्माण केली आहे.
या तिन्ही लोकार्पण सोहळ्यांना प्रमुख पाहुणे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार दिलीपराव सोपल, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, पक्ष गटनेते नागेश अण्णा अक्कलकोटे, इकबालभाई पटेल, युवासेना शहर प्रमुख हर्षवर्धन पाटील, माजी नगरसेवक महेश बाफना, पृथ्वीराज भैय्या बाफना, किरणजी देशमुख, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे, माजी नगरसेक आशोक बेकेफोडे , रुपेश बंगाळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
“आज बार्शीच्या भूमीत उभारले गेलेले हे तीन स्तंभ केवळ भौतिक उन्नतीचे नव्हेत, तर सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक जाणीव आणि संविधानिक मूल्यांची जपणूक करणारे आहेत. अशा स्मारकांमुळे पुढील पिढ्यांना आपल्या समृद्ध वारशाची जाणीव होईल. माझ्या विकास निधीतून अशा प्रेरणादायी प्रकल्पांना पाठबळ देणे हे माझे कर्तव्य आहे आणि त्यातून मला आत्मिक समाधान मिळते,” असे विचार खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांनी व्यक्त केले.
अहिंसा जैन स्तंभाचे लोकार्पण
सायंकाळी ६ वाजता सुभाष नगर येथील रिंग रोडवर उभारलेल्या अहिंसा जैन स्तंभाच्या लोकार्पण सोहळ्याने शुभारंभ झाला. जैन धर्माचे शाश्वत तत्त्व – “अहिंसा परमो धर्म” – जगाला शांततेचा आणि सहिष्णुतेचा मार्ग दाखवतो. बार्शीच्या या पवित्र भूमीत उभा राहिलेला हा स्तंभ हीच शिकवण आजच्या पिढीला देत राहील. समारंभास जैन समाजाचे ज्येष्ठ सदस्य, युवक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्तंभाच्या निर्मितीसाठी सातत्याने प्रयत्न करणारे पृथ्वीराज भैय्या बाफना यांचे विशेष कौतुक करण्यात आले. सूत्रसंचालन पवन श्रीश्रीमाळ यांनी केले. या वेळी प्रमुख मान्यवरांमध्ये प्रदीप बागमार, जयचंद सुराणा, पारस कांकरिया, महेश बाफना, बाहुबली नगरकर, अशोक बाफना, बाळासाहेब श्रीश्रीमाळ, पोपट पूनमिया यांचा समावेश होता.
अशोक स्तंभाचे लोकार्पण
सायंकाळी ८ वाजता भीमनगर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉम्प्लेक्स समोर उभारलेल्या अशोक स्तंभाचे लोकार्पण झाले. संविधान, एकता व सामाजिक समतेचा संदेश देणारा हा स्तंभ बार्शीच्या भूमीत संविधानिक मूल्यांचे भव्य प्रतीक म्हणून उभा राहिल आहे तसेच भविष्यातील पिढ्यांना आपल्या राष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत राहील. भीमसैनिक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तानाजी बापू बुकेफोडे, दिनेश नाळे,रुपेश बंगाळे, देवेंद्रजी कांबळे, संदलजी कांबळे, सुनीलजी बोकेफोडे, दत्ताजी सोनवणे, बब्रुवानजी अय्यर, सचिनजी सोनवणे भीमनगर भागातील नागरिक व भीमसैनिक आदींचा सहभाग होता.
क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे चौकाचे सुसज्जिकरण
संध्याकाळी ७ वाजता सुभाष नगर येथील लहुजी वस्ताद साळवे चौकाचा लोकार्पण सोहळा पार पडला. लहुजी वस्ताद हे सामाजिक क्रांतीचे अग्निशलाख होते, समाजात समानतेसाठी लढणाऱ्या या थोर योद्ध्यांच्या स्मृतीस अभिवादन करत उभारण्यात आलेला हा चौक सामाजिक न्याय, स्वाभिमान आणि समतेचे प्रतीक ठरतो. या सोहळ्यात आनंद चांदणे,कुणाल खंदारे,भास्कर बगाडे, बाबासाहेब वाघमारे, अतिशजी जाधव, विनोदजी शेंडगे यांच्यासह क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे चौक परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
“आज बार्शीच्या भूमीत उभारले गेलेले हे तीन स्तंभ केवळ भौतिक उन्नतीचे नव्हेत, तर सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक जाणीव आणि संविधानिक मूल्यांची जपणूक करणारे आहेत. अशा स्मारकांमुळे पुढील पिढ्यांना आपल्या समृद्ध वारशाची जाणीव होईल. माझ्या विकास निधीतून अशा प्रेरणादायी प्रकल्पांना पाठबळ देणे हे माझे कर्तव्य आहे आणि त्यातून मला आत्मिक समाधान मिळते” – खासदार ओमप्रकाश निंबाळकर
“बार्शी हे शहर केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे, तर सामाजिक समतेच्या दृष्टिकोनातून अग्रगण्य व्हावे, यासाठी हे स्तंभ प्रेरणादायी ठरतील. समाजघटकांमध्ये एकता, बंधुभाव आणि संविधानिक मूल्यांची रुजवणूक होण्यासाठी ही ठिकाणं केंद्रबिंदू ठरतील. जनतेच्या सहकार्याने आपण बार्शीला आदर्श शहर बनवण्याच्या दिशेने निश्चितच वाटचाल करत आहोत,” – दिलीप सोपल आमदार
