श्री जैन विद्या प्रसारक मंडळ, चिंचवड आयोजित कार्यक्रमात साधू-साध्वी व अनेक मान्यवरांची उपस्थिती
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित सेठ श्री पन्नालाल लुणकरण लुंकड वसतिगृह, चिंचवड येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा रविवारी, दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम उपप्रवर्तक प. पू. डॉ. गौरवमुनीजी म.सा. यांच्या संकल्पनेतून साकार झाला.
कार्यक्रमासाठी प. पू. मौनसाधक सौरवमुनीजी म.सा., प. पू. पुण्यस्मिताजी, प. पू. डॉ. गौरवमुनीजी म.सा., प. पू. प्रानिधीजी म.सा., प. पू. सार्थकमुनीजी म.सा. व प. पू. संप्रज्ञाची म.सा. यांचे पावन उपस्थिती लाभली.
सकाळी 10 वाजता वसतिगृहाच्या प्रांगणात स्व. श्री शंकरलालजी मुथा यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन आणि नवकार महामंत्र पठणाने वातावरण भक्तिमय झाले. ‘जैनम जयती शासनम’ असा जयघोष करत ध्वजारोहणही करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे कार्याध्यक्ष शांतीलाल लुंकड होते. त्यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या विकासकामांची माहिती दिली. प्रमुख अतिथी म्हणून ॲड. राजेंद्रकुमार मुथा (ऑनररी जनरल सेक्रेटरी), प्रा. अनिलकुमार कांकरिया (सहाय्यक सेक्रेटरी) उपस्थित होते.
आपल्या मनोगतात ॲड. मुथा यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत उपस्थितांना संस्थेसाठी आशीर्वाद देण्याचे आवाहन केले. तसेच प्रकाश धारीवाल (अध्यक्ष), झुंबरलाल चोपडा (उपाध्यक्ष), प्रकाशचंद चोपडा (कोषाध्यक्ष) आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात कृष्णा डायग्नोस्टिकचे चेअरमन राजेंद्र मुथा, समाजभूषण खिंवराज मुथा, नि. उपअभियंता महेंद्र कोठारी, सुमतीलाल लुणावत, जैन श्वेतांबर तेरापंथ सभा अध्यक्ष प्रकाश गादिया, रोहन बिल्डर्सचे दीपक भटेवरा, नितीन बेदमुथा, सुभाष ललवाणी, अशोककुमार पगरिया, जयप्रकाश रांका, सुरेश धाडीवाल, पृथ्वीराज धोका, मोहनलाल संचेती, अनिल गेलडा, महाराष्ट्र जैन वार्ताचे संकेत डुंगरवाल, भूषण जैन, सुभाष ओस्तवाल, किरण बाफना व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि अतिथी परिचय गृहपती महावीर जैन यांनी केले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थी रसिकांची मने जिंकली. यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प. पू. डॉ. गौरवमुनीजी यांनी मधुर प्रवचनातून स्नेह व समाजाप्रती कृतज्ञतेचा संदेश दिला.
प. पू. प्रानिधीजी यांनी पालक व वसतिगृहाचे उपकार विसरू नयेत, अशी शिकवण दिली. मैत्री व भक्तीवर आधारित गायनाचा कार्यक्रम विनोद फिरोदिया यांनी सादर केला. काही माजी विद्यार्थ्यांनी मनोगतं व्यक्त करत आठवणींना उजाळा दिला. मनीषा जैन यांनी वसतिगृहातील संस्मरणीय क्षण मांडले. संस्थेला 97 वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे.
माजी विद्यार्थी आपल्या कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित होते. चेअरमन सुमतीलाल ओस्तवाल यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन सोनाली ललवाणी यांनी उत्तमरित्या पार पाडले.
