आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मोबाईल हिसकावून नेणारे परप्रांतीय चोरटे गजाआड

Spread the love

पुणे : दरोड्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना पकडल्यानंतर अधिक तपासामध्ये हे चोरटे पायी जाणाऱ्या नागरिकांकडील मोबाईल हिसकावत असल्याचे निष्पन्न झाले. या ९ चोरट्यांकडून ८ लाख रुपयांचे ३० मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांचे मोबाईल या चोरट्यांनी चोरल्याचे उघड झाले आहे.

अभिषेक राजकुमार महातो (वय २२, रा. बिहार), दिनेश राजकुमार नोनिया (वय १८, रा. कटियारा, बिहार), रोहनकुमार विलोप्रसाद चौरोसिया (वय १९, रा. महाराजपूर, जि. साहेबगंज, झारखंड), राजेश धर्मपाल नोनिया (वय १८, रा. बर्धमान, पश्चिम बंगाल), सचिन सुखदेव कुमार (वय २०, रा. साहेबगंज, झारखंड), उजीर सलीम शेख (वय १९, रा. कटियारा, बिहार), अमीर नूर शेख (वय १९, रा. झारखंड), सुमीत मुन्ना महातोकुमार (वय १९, रा. झारखंड), कुणाल रतन महातो (वय २१, रा. कटियारा, बिहार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मुंबई-पुणे रोडवरील एका पेट्रोल पंपावर परप्रांतीय चोरटे लुटीच्या तयारीत असल्याची माहिती खडकी पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले यांना सोमवारी मिळाली होती.

त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्यांना पकडले. चौकशीत त्यांनी पादचारी नागरिकांचे मोबाईल हिसकावल्याचे गुन्हे केल्याची कबुली दिली. चोरट्यांकडून ८ लाख रुपयांचे ३० मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. जबरी चोरी, चोरी यासारखे गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, संदेश निकाळजे, अश्विनी कांबळे, आशिष पवार, सुधाकर राठोड, अनिकेत भोसले, सुधाकर तागड, ऋषिकेश दिघे, दिनेश भोये, शशांक डोंगरे, प्रताप केदारी, गालीब मुल्ला, प्रवीण गव्हाणे, तनुजा पाटील यांनी केली.