महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : समस्त ग्रामस्थ कोंढवा बुद्रुक वासिय व बधे इन्स्टिट्यूट संचालित माऊली प्रतिष्ठान यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल विठ्ठलराव वरुडे पाटील यांना माऊली समाज भूषण पुरस्काराने शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.
माय माऊली केअर सेंटर पुणे व लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज, या सामाजिक संस्थांचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव वरूडे पाटील अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात तसेच जेष्ठ नागरिक व रुग्णांच्या आरोग्य सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना कोंढवा बुद्रुक गावठाण येथे संयुक्त जयंती समारोह निमित्त विशेष कार्यक्रमात गौरवण्यात आले.
प्रसंगी लोकमतचे संपादक संजय आवटे माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सदीप बधे कोंढवा बुद्रुक गावचे ग्रामस्थ, माऊली प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरूडे पाटील यांना आत्तापर्यंत सामाजिक क्षेत्रातील बहुउपयोगी कार्यामुळे विविध सामाजिक संस्थांनी पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले आहे.
यामध्ये “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड” (लंडन) व “बुक ऑफ रेकॉर्ड” (लंडन) अशा आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा देखील समावेश आहे. सत्काराला उत्तर देताना वरूडे पाटील यांनी सांगितले की अशा प्रकारे समाज चांगल्या कामाची दखल घेत असल्याने काम करण्यासाठी दहा हत्तींचे बळ व आहोरात्र काम करण्याची उर्जा मिळत असते.
यामुळे कामाची जबाबदारी देखील वाढत असते. मिळालेला सन्मान गरजू जेष्ठ नागरिक व रुग्णांना समर्पित करत असून, अशाच प्रकारे सेवेची आपल्याला संधी मिळावी म्हणून गरजू रुग्णांनी संपर्क करून मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच पुरस्काराने सन्मानित केले याबद्दल आयोजकांचे आभार मानून धन्यवाद दिले.
