आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सराईत वाहनचोराकडून मोटारसायकल हस्तगत

Spread the love

पुणे : कात्रज चौकातील रसवंतीगृह दुकानासमोरील बाजूस पार्क केलेली गाडी चोरी करणाऱ्या सराईत वाहनचोराला पकडून भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याच्याकडून ही मोटारसायकल जप्त केली आहे.

मिथुन सुगंध लोखंडे (वय २२, रा. महात्मा गांधी सोसायटी, सहकारनगर) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे. कात्रज येथील रसवंतीगृहासमोर रस्त्यावर यामाहा मोटारसायकल १६ एप्रिल रोजी पार्क केली होती. ही मोटारसायकल चोरीला गेल्याची फिर्याद भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.

या वाहनचोराचा शोध घेत असताना सीसीटीव्ही फुटेजवरून ही चोरी मिथुन लोखंडे यानेच केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून चोरलेली यामाहा मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार यांनी केली आहे.