आवृत्ती पुणे
← Back to Homepage

संतोष सुपेकर भूम तालुका अध्यक्षपदी, बाबासाहेब वीर शहराध्यक्षपदी नियुक्त

Spread the love

भूम : भारतीय जनता पक्षाच्या भूम तालुका मंडळाच्या अध्यक्षपदी संतोष सुपेकर तर भूम शहर मंडळाध्यक्षपदी बाबासाहेब वीर यांची नियुक्ती पक्षश्रेष्ठींकडून करण्यात आली. या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, स्वागताचा जल्लोष पेढे वाटून व फटाके वाजवून करण्यात आला.

20 एप्रिल 2025 रोजी, रविवारी, तालुका भाजप कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत, जिल्हा निवडणूक निरीक्षक गुरुनाथ मगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर करण्यात आली. संपूर्ण निवड प्रक्रिया परंडा विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या देखरेखीखाली पार पडली.

या वेळी बोलताना क्षीरसागर यांनी सांगितले की, ही निवड पक्षाच्या ध्येयधोरणानुसार झाली असून, पूर्णवेळ कार्यकर्त्यांना नेतृत्व मिळाल्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचा प्रभाव अधिक वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील, मावळते तालुका अध्यक्ष महादेव वडेकर, अनुसूचित जाती-जमाती तालुका अध्यक्ष प्रदीप साठे, तालुका प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, उद्योग आघाडी तालुका अध्यक्ष चंद्रकांत गवळी, अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष योगेश आसलकर, युवा नेते आबासाहेब मस्कर, बन्सी काळे, कामगार मोर्चा मराठवाडा प्रदेश सदस्य सचिन बारगजे, बापू बगाडे, मुकुंद वाघमारे, शांतीराज बोराडे, शुभम खामकर, जोतीराम पावले (ईराचीवाडी), हनुमंत शेलार (आष्टा), ज्ञानेश्वर गिलबिले, विभीषण पवार (वालवड), सुबराव शिंदे (वाल्हा), ज्ञानेश्वर सानप (उळूप), अंकुश करडे (बऱ्हाणपूर), अलिभाई निमटके, अलीभाई इदूस (माणकेश्वर), सुहास सानप, सुरेश उपरे, युवा तालुका अध्यक्ष गणेश भोगिल, पिंटू भारती आदी मान्यवरांची उपस्थिती होती.